सैन्याच्या तयारींचा घेतला आढावा
वृत्तसंस्था/ लेह
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे रविवारी लडाखच्या तीन दिवसीय दौऱयावर पोहोचले आहेत. देशाबद्दल भारतीय सैनिकांचे आणि माजी सैनिकांचे समर्पण एक ‘अनुकरणीय उदाहरण’ असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. चीनसोबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान क्षेत्रात भारतीय सैन्याच्या तयारींचा आढावा राजनाथ सिंग घेणार आहेत. संरक्षणमंत्र्यांनी लेह, कारगिल आणि् लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी चर्चा केली आहे.
संरक्षणमंत्र्यांसोबत सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे देखील लडाखच्या दौऱयावर आहेत. या दौऱयादरम्यान राजनाथ यांनी सशस्त्र दलांयच माजी जवानांचीही भेट घेत त्यांच्या कल्याण तसेच राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित मुद्दय़ांवर चर्चा केली आहे. ज्याप्रकारे तुम्ही देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली आहे, त्याचप्रकारे तुमची देखभाल व्हावी हे आमचे लक्ष्य आहे. तरीही तुम्हाला कुठलीही समस्या असल्यास ती दूर करण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचे राजनाथ यांनी माजी सैनिकांना उद्देशून म्हटले आहे.
चीनसोबत संघर्षाच्या अनेक ठिकाणांवरून सैनिकांना मागे बोलाविण्याच्या पुढील टप्प्यात अडथळय़ादरम्यान संरक्षणमंत्री पूर्व लडाखमध्ये भारताच्या मोहिमात्मक तयारींचा समग्र आढावा घेणार आहेत. सैन्य तणाव दूर करण्यासाठी दोन्ही दिवसांपूर्वीच भारत आणि चीन यांच्यात नव्या फेरीतील चर्चा झाली असताना राजनाथ सिंग यांचा या संवेदनशील भागांमध्ये दौरा होत आहे.