ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
चीनची ‘बायटन’ ही इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी लवकरच ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक कार दाखल करणार आहे. ‘के-बाइट’ असे या कारला नाव देण्यात आले आहे. ही कार टेस्ला मॉडेल 3 ला टक्कर देणार आहे.
बायटनने 2018 मध्ये ही कार प्रथम ऑटो एक्सपोमध्ये सादर केली होती. पुढील वर्षी बाजारात ही कार दाखल होऊ शकते. बायटनची ‘के-बाइट’ इलेक्ट्रिक कार दोन व्हर्जनमध्ये लाँच केली जाईल. कारचा बेस व्हेरिएंट 75kWh आणि टॉप व्हेरिएंट 95kWh बॅटरी पॅकसह येईल. 75 kwh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येणारी वेरियंट एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 402 किमी तर 95kWh बॅटरी पॅक व्हेरियंटची कार 520 किमी धावेल.
या इलेक्ट्रिक कारची किंमत 35 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे.