मुंबई
चिनी कंपनी लेनोव्हाने भारतीय बाजारात आपल्या नव्या प्रिमीयम टॅबलेट पी 11 ला सादर केले आहे. याला डॉल्बी व्हिजन आणि एचडीआरचे सहकार्य असेल.
सदरच्या टॅबलेटची स्पर्धा सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस 7 आणि ऍपल आयपॅड एअर यांच्याशी होईल. टॅब पी 11 प्रोची किंमत 44 हजार 999 रुपये इतकी सुरूवातीची असणार आहे. स्लेट ग्रे रंगात हा टॅब येणार असून 14 फेब्रुवारीपासून ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि लेनोव्हाच्या अधिकृत संकेतस्थळावर याची विक्री सुरू झाली आहे. कंपनीच्या विक्री केंद्रांवरही टॅब खरेदी करता येईल, असे कंपनीने सांगितले आहे. याला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा, अँड्रॉइड 10 ऑपरेटींग सिस्टम, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रगन 730 जी प्रोसेसचे सहकार्य असणार असून 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची सुविधा यात असेल.