निर्माते किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक यांच्या डॉक्टर डॉक्टर चित्रपटाच्या यशानंतर ते पुन्हा एकदा नव्या कोऱया आणि दमदार विषयाच्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. निर्माता किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक सह निर्माता हर्षवर्धन भरत गायकवाड, स्वाती खोपकर आणि सहनिर्माते म्हणून निनाद बट्टीन आणि तबरेज पटेल यांचाही या चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात वाटा आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित संघमित्रा करत असून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तिच्यासह या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून पोस्टरमध्ये मास्क हा अंतरपाट म्हणून धरण्यात आला आहे. आणि त्यावर आमंत्रण पत्रिकाही छापली आहे. तर ओवाळणीच्या ताटासोबत सॅनिटायझर, ऑक्सािमिटर ठेवण्यात आले आहे. लंडनच्या लॉकडाऊनमध्ये आयुष्यभराचे क्वारंटाईन असा आगळावेगळा विषय घेऊन चित्रपट येणार आहे. त्यामुळेच एकूणच नेमकं या चित्रपटात काय घडणार, वा कथानकाचे स्वरूप काय असणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा वळल्या आहेत.या चित्रपटाची मजेदार कथा सुमीत संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. तर या चित्रपटाचे डिओपी योगेश कोळी आहेत.