प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या काळातही रेल्वे विभागाकडून रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे या काळात काम करणे सोपे असल्यामुळे रविवारपासून शहरालगतच्या रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
रेल्वे स्थानकापासून ते अनगोळ येथील चौथ्या रेल्वेगेटपर्यंत रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. टॅकवरील खडीकरण व इतर दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे पहिले व दुसरे रेल्वेगेट बंद करण्यात आले होते. पार्सल व मालवाहू रेल्वे वाहतूक वगळता इतर सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या काळात दुरुस्ती करण्यासाठी वेळ मिळत असल्याने हे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
चौकट करणे
अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट दुरुस्तीसाठी राहणार बंद
रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवार दि. 5 रोजी रात्री 10 ते बुधवार दि. 6 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार आहे. अनगोळमधून उद्यमबागला जाणारी सर्व वाहतूक या मार्गे जात असल्यामुळे त्या वाहनांना इतर मार्गांनी जावे लागणार आहे. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.