प्रतिनिधी /बेळगाव
नेहरुनगर येथील विघ्नहर्ता फौंडेशनतर्फे शिवजयंतीपासून गरजू पोलीस, हॉस्पिटलमधील कर्मचारी, सफाई कर्मचाऱयांना फळे, अल्पोपाहार, रेशन किटचे वाटप करण्यात येत आहे. नेहरुनगरपासून तिसऱया रेल्वेगेटपर्यंत रस्त्याशेजारी राहणाऱया गरिबांना पुलाव वाटप करण्यात येत आहे. दररोज 200 ते 250 लोकांना खाद्यपदार्थ पोहोचविले जात आहेत. यामध्ये राहुल बडसकर, शरद पाटील, संजय नाईक, सुरेश कुमार, ओंकार बर्डे, गौरव वाके, विशाल पट्टणशेट्टी, गणेश वाके, श्री पाटील, सागर बेन्नाळकर, किरण नेसरेकर, शिवराज जनमट्टी, सतीश पाटील, प्रमोद पाटील, संतोष पाटील, सुमित भोज, प्रवीण यांच्यासह इतर सदस्य या उपक्रमासाठी मेहनत घेत आहेत.