हिरेबागेवाडी येथील दहा तर कुडचीतील एकाला कोरोना
प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारचा दिवस केवळ बेळगावसाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी ब्लॅक फ्रायडे ठरला. राज्यात एका दिवसात 48 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये हिरेबागेवाडी येथील दहा व कुडची येथील एकाचा समावेश असून बेळगाव जिल्हय़ातील बाधितांची संख्या 85 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाला धक्काच बसला आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून बेळगावला दिलासा मिळत होता. हिरेबागेवाडी येथील एका 13 वषीय मुलीचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला होता. शुक्रवारी एका दिवसात जिल्हय़ातील 11 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये हिरेबागेवाडी येथील पाच महिलांचाही समावेश आहे.
एका दिवसात मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळले
शुक्रवारी दुपारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये कर्नाटकातील 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर करण्यात आले होते. तर सायंकाळच्या बुलेटिनमध्ये ही संख्या 48 वर पोहोचली होती. आतापर्यंत एका दिवसात इतक्मया मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळून आल्याचा हा पहिल्याच प्रकार आहे.
हिरेबागेवाडी येथील 58 वषीय इसम, 30 वषीय महिला, 20 वषीय तरुण, 16 वषीय तरुणी, 21 वषीय महिला, 45 वषीय युवक, 26 वषीय तरुण, 38 वषीय महिला, 20 वषीय महिला व 23 वषीय तरुणाचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर कुडची येथील 20 वषीय तरुणालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विलगीकरण कक्षात दाखल
या सर्व 11 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. जिल्हय़ातील बाधितांची संख्या 85 वर पोहोचली असून यापैकी हिरेबागेवाडी येथील एका वृद्धेचा मृत्यूही झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 36 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. एका हिरेबागेवाडी येथील बाधितांची संख्या 47 वर पोहोचली आहे.
जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली
हिरेबागेवाडी (ता. बेळगाव), कुडची (ता. रायबाग) येथील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या सर्व 11 जणांना कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातून लागण झाली आहे. निकटवर्तीय संपर्कातून कोरोनाचा फैलाव वाढत चालल्याचे यावरुन दिसून आले आहे.
आणखी 233 अहवालांची प्रतीक्षा
शुक्रवारी सायंकाळी जिल्हा सर्वेक्षण विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये प्रशासनाला जिल्हय़ातील आणखी 233 जणांच्या स्वॅब तपासणी अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने 7 हजार 366 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले असून 3 हजार 580 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 6 हजार 180 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून 5 हजार 808 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 38 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.