मागणीची घेतली दखल
प्रतिनिधी/ बेळगाव
शेट्टी गल्ली येथे एकाच ठिकाणी दोन ट्रान्स्फॉर्मर असल्याने ये-जा करण्यास नागरिकांना व दुकानदारांना अडथळा निर्माण झाला होता. यापैकी एक ट्रान्स्फॉर्मर इतरत्र हलवावा, अशी मागणी रहिवाशांकडून हेस्कॉमला करण्यात आली होती. त्याची कार्यवाही झाल्याने रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ओमेगा ऑफसेटसमोर एकमेकाला लागून दोन ट्रान्स्फॉर्मर गेल्या अनेक वर्षांपासून होते. जागेअभावी यातील एक ट्रान्स्फॉर्मर इतरत्र हलविण्याची मागणी करण्यात आली होती. हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर यांनी वरि÷ अधिकाऱयांशी पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळविली.
दोन दिवसांपूर्वी यातील एक ट्रान्स्फॉर्मर दुसरीकडे सिंगल पोलवर बसविण्यात आल्याने अडचण कमी झाली आहे. यामुळे रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.