गोडोली / प्रतिनिधी
सातारच्या मल्हार पेठ येथील नगरपालिका शॉपिंग सेंटर शेजारी क्लासिक हॉर्न लगतचे सार्वजनिक शौचालयाची मोठी दुरावस्था झाली आहे. अनेक वेळा स्थानिकांनी दुरुस्तीबाबतीत पालिका आणि नगरसेवकांना विनंती केली. मात्र त्यांच्या निर्ष्कियचा अनुभव आल्याने शिवसेना शहर अध्यक्ष निलेश मोरे यांच्याकडे कैफियत मांडली.तत्काळ शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेला दि.२० नोव्हेंबर पर्यंत सदरच्या शौचालयाचे कामे करायला, तुम्हाला जमतंय का बघा नाही तर शिवसैनिक निधी संकलन करून सदरची कामे करून दाखवतील ,” असा इशारा उप मुख्याधिकारी पराग कोडगुले यांना निवेदन देऊन दिला आहे.
गेली शहरातील सार्वजनिक शौचालय राजकीय खुन्नसीतून काही वाँर्डातील जाणीवपूर्वक शौचालयाची दुरुस्तीची काम न केलेने नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागते.त्यातील मल्हार पेठेतील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली आहे. ऐतिहासिक सातारा शहराच्या नगरपालिकेला अशोभनिय आहे.या परिसरातील नागरिकांनी पडझड अन्य गैरसोईचे झाले असून त्याबाबत वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेच्या प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिले.या शौचालयाच्या पडझड दुरूस्तीचे काम, रंगरंगोटी काम, दिवाबत्तीची सोय करणे आवश्यक आहे. याबाबत शिवसेनेचे शहर अध्यक्ष निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेचे उप मुख्याधिकारी पराग कोडगुले यांना निवेदन देऊन दिला आहे.
यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख अभिजित सपकाळ, गणेश आहिवले विभाग प्रमुख सुमित नाईक, गोडोली विभाग प्रमुख अमोल खुडे, पंतांचा गोट शाखा प्रमुख अमोल पवार, प्रथमेश बाबर, सयाजी शिंदे, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे कामे दि.२० नोव्हेंबर पर्यंत नगरपालिकेने केले नाही तर अकार्यक्षम पालिकेच्या निषेधार्थ लक्षवेधी करून दाखवतील. हे काम तुम्हाला जमतंय का बघा नाही तर शिवसैनिक निधी संकलन करून सदरची कामे करून दाखवतील ,” असा इशारा उप मुख्याधिकारी पराग कोडगुले यांना निवेदन देऊन दिला आहे.