प्रतिनिधी /बेळगाव
श्री स्पोर्ट्स खडकगल्ली आयोजित दुसऱया श्री चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन व चषक अनावरण मोठय़ा उत्साहात पार पडले.
व्हॅक्सिनडेपो येथील मैदानावर या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल बेनके, प्रमुख पुरस्कर्ते विजय आचमनी, मल्लीकार्जुन जगजंपी, शितल पाटील, बाळू तोपिनकट्टी, कोमल पाटील, युवराज जाधव, पंच कमिटी व सल्लागार मंडळ उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून चषकाचे अनावरण करण्यात आले. मैदानात यष्टीचे पूजन अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारी प्रदर्शनीय सामने होणार असून, प्रमुख स्पर्धा रविवारपासून प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेत अ गटात इंडियन बॉईज हिंडलगा, अनगोळ स्टार इलेव्हन, फॅन्को स्पोर्ट्स बेळगाव, सरदार वॉरियर्स, डेपो मास्टर, मराठा स्पोर्ट्स ग्रामीण, बालाजी स्पोर्ट्स, झेन स्पोर्ट्स, ब गटात विघ्नहर्ता अनगोळ, कलमेश्वर स्पोर्ट्स, यूपी इलेव्हन स्टार, मराठा स्पोर्ट्स बेळगाव, डिंगडाँग बेळगाव, हिंदू स्वराज, सदा स्पोर्ट्स, साईराज स्पोर्ट्स, सी गटात यूपी इलेव्हन, लेव्हन स्टार, एस. के. कोल्हापूर, जेजे बॉईज, एस. आर. स्पोर्ट्स, आतिक स्पोर्ट्स यमकनमर्डी, इंदिरा पॉईंट, एसआरएस हिंदुस्थान. डी गटात सरकार स्पोर्ट्स गांधीनगर, एस. जी. स्पोर्ट्स, अलरझा, युवा स्पोर्ट्स, शितल रामाशेट्टी, नियती फौंडेशन (सरनोबत), अक्षता स्पोर्ट्स, मोहन मोरे इलेव्हन आदी संघांचा समावेश आहे.
शनिवारी निमंत्रितांच्या प्रदर्शनीय स्पर्धेतील पहिला सामना लोकमान्य महामंडळ वि. एस. पी. पोलीस सकाळी 9 वा., दुसरा सामना हेस्कॉम वि. टिळकवाडी पोलीस यांच्यात 11 वा., तिसरा सामना पत्रकार वि. पोस्ट संघ, दु. 1 वा. यांच्यात होणार आहे.