क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
श्री स्पोर्ट्स खडकगल्ली आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साईराज स्पोर्ट्सने सदा स्पोर्ट्सचा, सरकार स्पोर्ट्सने एसजी स्पोर्ट्सचा, अल रजा संघाने युवा स्पोर्ट्सचा, डिंगडाँग स्पोर्ट्सने हिंदू स्वराजचा, सरकार स्पोर्ट्सने अल रजा संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. रब्बानी दफेदार, मंजुनाथ नागण्णावर, अनिकेत बुचडी, मोसीम सनदी, विनोद ढवळे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सदा स्पोर्ट्सने 8 षटकात 6 बाद 56 धावा केल्या. विशाल बेडकाने 17 तर निखिलने 16 धावा केल्या. साईराजतर्फे रब्बानी दफेदारने 3 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना साईराज स्पोर्ट्सने 3.5 षटकात 1 बाद 57 धावा करत सामना 9 गडय़ांनी जिंकला. मदन बेळगावकरने 6 षटकार 1 चौकारासह 44 धावा केल्या. दुसऱया सामन्यात एस. जी. स्पोर्ट्सने 8 षटकात 4 बाद 55 धावा केल्या. मनोज एन.ने 17 तर परशरामने 14 धावा केल्या. सरकारतर्फे विजयने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना सरकार स्पोर्ट्सने 3.1 षटकात 1 बाद 58 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. सागरने 29 तर संदीपने 16 धावा केल्या.
तिसऱया सामन्यात युवा स्पोर्ट्सने 8 षटकात 7 बाद 87 धावा केल्या. हर्षने 17 तर लल्लाने 18 धावा केल्या. अल रजातर्फे वाहिद व अलिम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना अल रजा संघाने 8 षटकात 5 बाद 88 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. मोहसीन सनदीने नाबाद 27 तर अझर व मतिन यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. चौथ्या सामन्यात हिंदू स्वराजने 7.1 षटकात सर्व बाद 32 धावा केल्या. डिंगडाँगतर्फे विनोद व रामदेव यांनी प्रत्येकी 3 तर प्रशांत आणि नंदू यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना डिंगडाँगने 4 षटकात 3 बाद 36 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. प्रवीण व गणपत यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. पाचव्या सामन्यात अल रजा संघाने 8 षटकात 3 बाद 65 धावा केल्या. अलिमने 26 तर अझरने 21 धावा केल्या. त्याला उत्तर देताना सरकार स्पोर्ट्सने 5.3 षटकात 4 बाद 69 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. संदीपने 22 तर सागरने 15 धावा केल्या. अल रजातर्फे परवेझने 2 गडी बाद केले.
शनिवारचे सामने : अक्षित स्पोर्ट्स वि. मोहन मोरे सकाळी 8.30 वा., शितल रामशेट्टी वि. नियती फौंडेशन सकाळी 10.30 वा., डिंगडाँग वि. साईराज दु. 1.30 वा., चौथा सामना पहिल्या सामन्यातील विजेता वि. दुसऱया सामन्यातील विजेता दु. 3.30 वा.