आयुष्यात यू टर्न जर योग्य ठरला तर करिअरची गाडी वेगाने धावते. असाच एक यूटर्न अभिनेत्री श्रुती अत्रे हिने घेतला. हा टर्न घेतला म्हणूनच आज श्रुती सी.ए. बनून मोठमोठय़ा व्यावसायिकांना जमाखर्चाचे सल्ले देत बसण्यापेक्षा तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या पसंतीचा आलेख चढता ठेवत आहे. सध्या राजा राणीची गं जोडी या मालिकेत राजश्री या भूमिकेतून गाजत असलेली श्रुती खरं तर सीएचा अभ्यास करत होती. सी.ए. की नाटक यापैकी एकच काहीतरी निवडण्याची वेळ तिच्यावर आली तेव्हा खरंतर तिने सी.ए.ला झुकतं माप दिलं होतं. पण जेव्हा ती सी. ए. परीक्षेचा अभ्यास करायला लागली तेव्हा तिचं मन काही रमेना. हाच तो तिच्या आयुष्यातील यू टर्न ठरला आणि तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला.
अनेकांच्या आयुष्यात असं एक वळण येतं की जेव्हा त्याला दोन गोष्टींपैकी एक काहीतरी निवडावं लागतं. पण ही निवड करिअर म्हणून करायची असेल तर खूप विचाराने करावी लागते. आयुष्यात हा यू टर्न जर योग्य ठरला तर करिअरची गाडी वेगाने धावते. असाच एक यू टर्न अभिनेत्री श्रुती अत्रे हिने घेतला. हा टर्न घेतला म्हणूनच आज श्रुती सी.ए. बनून व्यावसायिकांना जमाखर्चाचे सल्ले देण्यापेक्षा अभिनयामधील रुची वाढविण्याचा प्रयत्न करत राहिली आहे.
जेव्हा हा किस्सा नेमका काय होता हे सांगायची वेळ तिच्यावर या सोशल मीडिया चॅलेंजवर आली तेव्हा ती सी.ए. की अभिनय या वळणावर पोहोचली. श्रुती म्हणते, मी मूळची सातारकर आहे. साताऱयात माझ्या लहानपणी खूप बालनाटय़,
एकांकिका व्हायच्या. बारावीनंतर जेव्हा मी शिक्षणासाठी पुण्याला आले तिथे तर प्रायोगिक नाटक, एकांकिका, नाटय़स्पर्धा यांचा खजिनाच मला सापडला. नाटकांची तालीम, स्पर्धेसाठी दौरे, नाटय़प्रयोगाची वेळ यातून कुठेच सीएच्या अभ्यासासाठी वेळ काढण शक्य नव्हतं.