प्रतिनिधी / बेळगाव
संस्कार भारतीतर्फे मकर संक्रांत आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तिळगुळाचे दागिने तयार करणे ही स्पर्धा महिलांसाठी घेण्यात आली तर मुलांसाठी देशभक्तीपर गीत स्पर्धा घेण्यात आली. आयएमईआर येथे ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे-
तिळगूळचे दागिने- 1) जयश्री हणमशेठ, 2) सरिता पाटील, 3) वैष्णवी मठद, 4) वारुणी मठद, 5) गौतमी हलगेकर. परीक्षक म्हणून राधिका बर्वे व प्राजक्ता बेडेकर यांनी काम पाहिले.
देशभक्तीपर गीत स्पर्धा- लहान गट- 1) तन्वी इनामदार, 2) श्रीनिधी पुंडे, 3) श्रु÷ाr देसाई, उत्तेजनार्थ अंतरा कुलकर्णी.
खुला गट-1) श्रेया देशपांडे, 2) सुजाता हुंचेनहट्टी, 3) काजल धामणेकर, 4) राजेंद्र कर्नाटकी, 5) अश्विनी गावडे. परीक्षक म्हणून रोहिणी गणपुले व मुकुंद गोरे यांनी काम पाहिले. सर्व स्पर्धकांना सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य, संस्कार भारतीचे वेंकटेश कुलकर्णी, बेळगाव शाखेच्या अध्यक्षा गीता देशपांडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.