प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी आठ जणांची वाढ झाली आहे. यामध्ये औंढी तालुका जत येथील 55 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. सदर व्यक्ती 16 मे रोजी मुंबईहून आलेली आहे. करंजे ता. खानापूर येथील ३० वर्षीय पुरुष कोरोनाबाधित झाला असून सदर व्यक्ती 18 मे रोजी मुंबईहून आलेली आहे. नेर्ली येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा 28 वर्षीय मुलगाही कोरोनाबाधित झाला आहे. रेड ता. शिराळा येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा निकटवर्तीय २० वर्षीय पुरुष नातेवाईक कोरोणा बाधित झाला आहे. खिरवडे ता. शिराळा येथील कोरोणा बाधित व्यक्तीच्या निकटवर्तीय 52 वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे. कचरेवाडी ता. तासगाव येथील 28 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित झाला आहे. आंबेगाव तालुका कडेगाव येथील कोरोना बाधित झालेल्या रुग्णाची बारा वर्षीय मुलगी तसेच नऊ वर्षीय मुलगा ही कोरोनाबाधित झाला आहे.
तर नेर्लीतील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा हा चौथा बळी असून आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 109 वर गेला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहे.