कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी : 951 चिंताजनक : 371 जणांची कोरोनावर मात
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी तब्बल 883 नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये सर्वाधिक महापालिका क्षेत्रातील 205 (सांगली शहर 156 व मिरज शहर 49) रुग्णांबरोबर वाळवा तालुक्यातील 139 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान उपचार सुरु असताना 15 रुग्णांचा मृत्यू झाला. तर तब्बल 951 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा धास्तावला आहे.
वाळवा तालुका, महापालिका क्षेत्रात सर्वाधिक
शुक्रवारी वाळवा तालुक्यातील 139 तर महापालिका क्षेत्रातील सांगली शहरात 156 तर मिरज शहरात 49 नवे रुग्ण सापडले. तर खानापूर तालुक्यात 79, मिरज 77, आटपाडी 56, कडेगाव 68, पलूस 23, तासगाव 51, जत 70, कवठेमहांकाळ 46 तर शिराळा तालुक्यात 69 रुग्ण सापडले.
15 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल 15 रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यामध्ये महापालिका क्षेत्रातील आठ (सांगली 7 व मिरज 1) रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाळवा तालुक्यात दोन, आटपाडी, कडेगाव, पलूस, तासगाव व मिरज तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
951 चिंताजनक, 371 बरे
अजूनही 951 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. दरम्यान जिल्ह्यातील उपचाराखालील रुग्ण संख्या 6 हजार 25 इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात तब्बल 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील स्थिती भयावह झाल्याने नागरिकांच्यामध्ये घास्ती निर्माण झाली आहे.
कोरोना जिल्हा स्थिती
आजचे रुग्ण 883
मृत्यू 15
बरे रुग्ण 371
उपचाराखालील रुग्ण 6025
चिंताजनक रुग्ण 951
एकूण रुग्ण 59303
बरे रुग्ण 51374
मृत रुग्ण 1889
शुक्रवारचे लसीकरण 18,537
एकूण लसीकरण 3,87,692