प्रतिनिधी/ बेळगाव
सांबरा येथे मागील काही महिन्यांपासून लिंगायत स्मशानभूमीच्या विकासासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी ग्राम पंचायतीनेही प्रयत्न केले. मात्र निधी उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण होत होती. दरम्यान तालुका पंचायत सदस्य काशिनाथ धर्मोजी यांनी तालुका पंचायतमधून संयुक्त अनुदानातून मंजूर झालेला अडीच लाखांचा निधी लिंगायत स्मशानभूमीसाठी खर्च करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मंजूर झालेल्या निधीतून स्मशानभूमीमध्ये कट्टा व शेगडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर आणखी काही बारीकसारीक कामे असतील तीही यावेळी करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी संबंधित स्मशानभूमीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणाऱया काशिनाथ धर्मोजी यांचे आभार मानण्यात आले. यावेळी लिंगायत बंधूंनी कोणताही धर्मभाव न बाळगता म. ए. समितीचे कार्यकर्ते असूनही जातीभेदापलिकडे त्यांनी काम केले आहे. लिंगायत स्मशानभूमीच्या विकासासाठी त्यांनी मंजूर केलेल्या निधीमुळे विकास साधता येणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सदस्य काशिनाथ धर्मोजी यांच्या हस्ते कुदळ मारुन पूजन करण्यात आले. यावेळी शिवाजी देसाई, साधु पाटील, महेश कुलकर्णी, सुरेश देसाई, वाय. के. धर्मोजी, गंगाराम तिम्मापुरीमठ, सोमशेखर करडीगुद्दी, अशोक सुळेभावी, जी. हिरेमठ, निंगाप्पा देसाई, प्रवीण जमकनड्डी, भरमा पाटील, रामगोंडा देसाई, दीपक हिरेमठ यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते..