प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचा घट्ट विळखा पडू लागला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहर आणि गावागावात कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसात सातारा जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरलेली सातारा, कराड आणि वाई या तिन्ही शहरात बाधित होण्याचा वेग कमालीचा वाढला आहे. जिल्ह्यात बाधित होण्याचा पंधरा दिवसात डब्लिंग रेट झाला आहे. 20 औगस्टला 9000 हजार बाधित होते, आज तो आकडा 18 हजाराकडे चालला आहे, तर दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या अडीच पट एवढी झाली आहे. मृत्यूदर ही वाढला आहे. रात्रीच्या अहवालात तबल 875 जण बाधित आढळून आले होते. बाधितांची संख्या 17 हजार 663 वर पोहचली आहे. उपचार घेत असलेले 7 हजार 427 एवढे असून जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात बेड शिल्लक नाही. ऑक्सिजनचा तुटवडा, सततच्या कामामुळे प्रशासन त्रासले आहे. होम आयसोलेशन मध्ये अनेक बधितांचा उपचार सुरू आहे.
मेढा, कराड, खटाव लॉकडाऊन
स्वयंप्रेरणेने जिल्ह्यातील मेढा, कराड यासारखी काही शहरे, बावधन अशा गावामध्ये पुन्हा लॉकडाऊन पाळला जाऊ लागला आहे. सातारा शहरातही लॉकडाऊनची मागणी सामाजिक संघटनांकडून होऊ लागली आहे. काल रात्री ते सकाळपर्यंत जिल्ह्यात 11 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
कोरोना महामारीने बाधित होण्याचे प्रमाण जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात डब्लिंगने झाले आहे. दि.20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात 337 जण बाधित आढळून आल्याने त्यावेळी आकडा 9 हजार 8 वर पोहचला होता. कोरोनामुक्त 260 जण झाले होते. त्यावरून जिल्ह्यात त्यावेळी 4 हजार 918 जण बरे झाले होते. 681 जणांचे त्या दिवशी घशातले स्त्राव तपासणी केल्याने त्यावेळी 38 हजार 707 जणांची तपासणी केली होती. त्या दिवशी आठ जणांचा मृत्यू होऊन आकडा 277 वर पोहचला होता. तब्बल पंधरा दिवसांनी जिल्ह्याचा हाच आकडा दुप्पटीने वाढला आहे. आतापर्यंत 48हजार 264 जणांचे नमुने तपासणी केली त्यापैकी 17हजार 663 जण बाधित सापडले. त्यातील 9हजार774 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 473 जणांचा मृत्यू झाला आहे. 7हजार416 जण उपचारात आहेत. दररोज येणाऱ्या अहवालात अडीच पटीने रुग्ण वाढत आहेत.
रात्रीच्या अहवालात कराड तालुक्यातील 201 जण बाधित, सातारा तालुका 193 जण बाधित, खंडाळा तालुका 22, पाटण तालुका 26, माण तालुका 39, खटाव 39, कोरेगाव 51, फलटण 84, जावली 59, वाई 86, महाबळेश्वर 29 जण आढळून आले आहेत. कोरोनाचा कहर रोखण्यासाठी आता काही शहरे स्वतः हुन लॉकडाऊन करत आहेत.मेढा शहर शनिवार ते शनिवार असा लॉकडाऊन सुरू केला आहे. रात्रीच्या अहवालात मेढा येथील 48 जण बाधित आढळून आले आहेत. तर सातारा तालुक्यातील महागाव हे आता हॉटस्पॉट ठरत आहे.
जिल्ह्यात 875 जण कोरोनाबाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यू
जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 875 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरानाबाधित अहवालामध्ये :
कराड तालुक्यातील कराड 48, मंगळवार पेठ 2, सोमवार पेठ 10, शनिवार पेठ 5, रविावार पेठ 3, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, शिवाजी हौसिंग 1, कृष्णा हॉस्पीटल 1, मलकापूर 11, आगाशिवनगर 6, कोयना वसाहत 1, वाखन रोड 1, कर्वे नाका 7, शिरवडे 1, खोडशी 1, शेरे 11, घोनशी 2, ओंड 1, कार्वे 1, रेठरे 3, बनवडी 1, वाटेगाव 1, सैदापूर 1, काले 3, आटके 1, नंदगाव 1, श्रद्धा क्लिनीक 4, सुपने 1, वहागाव 3, वनवासमाची 1, मसूर 1, बनपुरी कॉलनी कराड 1, कोडोली 1, पाल 2, वाखन रोड 4, आरेवाडी 1, राजाळे 1, उंब्रज 8, पाली 1, कोपर्डे 1, जाखीनवाडी 1, गोळेश्वर 2, शहापुर 1, रेठरे खु 1, पार्ले 2, बहुरे 1, ओगलेवाडी 1, कपिल 1, कोडोली 1, किवळ 2, हजारमाची 4, विरवाडे 7, रेठरे बु. 2, सुपने 1, ओंडोशी 1, ओंड 1, उंडाळे 2, वारुंजी फाटा 1, मुंडे 1, हंबनरवाडी 1, वाठार 1, बेलवडे बु 1, चोपडी 1, शेनोली 2, बेलदरे 1, रीसवड 1, जुळेवाडी 1, विद्यानगर कराड 1,
सातारा तालुक्यातील सातारा 15, सोमवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, मंगळवार तळे 1, शनिवार पेठ 9, मंगळवार पेठ 3, रविवार पेठ 1, सदरबझार 13, मल्हार पेठ 3, कर्मवरी नगर 1, प्रतापसिंहनगर 1, करंजे 2, गोडोली 4, विलासपूर 2, आरदरे 1, विकासनगर 14, पोली हेडक्वॉटर 2, गोवे 3, बसाप्पाचीवाडी 2, नुने 4, भरतगाव 2, कोडोली 2, नागठाणे 1, सम्राटर मंदिर 2, आंबवडे 1, चिंचणेर वंदन 2, गोवे 1, खेड 2, संगमनगर 2, प्रतापगंज पेठ 1, म्हसवे 1, शाहुपुरी 6, यादोवगोपाळ पेठ 2, कामथी 1, वर्ये 2, खिंडवाडी 3, महागाव 35, राधिका रोड 1, गुलमोहर कॉलनी सातारा 1, पाटखळ 1, शेंद्रे 1, कोडवे 1, बोरगाव 1, आरळे 1, काशिळ 1, रामाचा गोट 1, देवी चौक सातारा 1, संभाजीनगर सातारा 1, दौलत नगर सातारा 5, शाहुनगर सातारा 3, वाढे 1, गोळीबार मैदान सातारा 2, तामाजाई नगर सातारा 6, संभाजीनगर सातारा 1, आरळे 1, क्षेत्र माहुली 1, अंगापूर वंदन 1, देगाव रोड सातारा 1, शिवथर 1, गुलमोहर कॉलनी, सातारा 1, चिमणपुरा सातारा 1, व्यंकटपुरा पेठ सातारा 1, देगाव 1, विसावाना नाका, सातारा 1, शेलारवाडी 1,
खंडाळा तालुक्यातील सांगवी 2, शिवाजी चौक शिरवळ 2, सुखेड 2, खेड 3, लोणंद 2, पारगाव 1, वडगाव 2, शिरवळ 6, अंधोरी 1, पळशी 1,
पाटण तालुक्यातील पाटण 7, नवारस्ता 1, आडुळगाव 1, नवसारी 1, येरवडी 1, साबळेवाडी 4, गुढे 4, धुमाळवाडी 3, ढेबेवाडी 3, शिबेवाडी 1,
माण तालुक्यातील माण 1, तोंडले 1, दहिवडी 8, स्वरुपखानवाडी 1, म्हसवड 22, तांडले 1,भांडवली 2, भातकी 1, गोंदवले खुर्द 1, मोग्राळे 1,
खटाव तालुक्यातील खटाव 5, कातर खटाव 6, वडूज 6, पाचवड 4, राजापूर 4, चितळी 1, मायणी 1, औंध 5, जाखनगाव 2, वेटने 2, खादगुण 2, वडगाव 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 10, आझाद चौक 1, आरवी 1, भक्तवडी 2, कुमठे फाटा 4, कुमठे 2, तळीये 2, चिंचळी 1, तारगाव 3, आझादपूर 1, तडवळे 1, शुदुरजाणे 1, सातारा रोड कोरेगाव 4, थांदडवाडी 2, पिंपोडे बु 3, वाघोली 1, देवूर 2, वाघोली 2, सर्कलवाडी 1, वाठार स्टेशन 2, रहिमतपूर 4, धामणेर 1,
फलटण तालुक्यातील फलटण 6, लक्ष्मीनगर 5,मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 2, सोमवार पेठ 2, विद्यानगर 1, रविवार पेठ 1, मालेवाडी 1, मलटण 7, बरड 1, खराडेवाडी 5, पवारवाडी 9, कोळकी 3, काळज 2, पिंपळवाडी 1, भाडळी बु 1, धुमाळवाडी गिरवी 1, सगुनामाता नगर 3, साखरवाडी 2, विद्यानगर 1, कसबा पेठ 1, मोगिरी 1, कांबलेश्वर 4, जिंती 4, इंद्रानगर 1, भैरोबा गल्ली 1, सरडे 1, खुंटे 2, निंबळक 1, विडणी 1, निंबळक 1, पोलीस कॉलनी फलटण 2, आलगुडेवाडी 1, वेटने 1, बीरावडे नगर फलटण 1, मोनगिरी 1, सस्तेवाडी 2,
जावली तालुक्यातील जावली 1, उंबरीवाडी 2, मेढा 48, रिटकवली 1, जवालवाडी 1, खरशी 4, रायघर 1, खरशी 1,
वाई तालुक्यातील वाई 5, सोनगिरीवाडी 4, भगवा कटा10, उडतारे 1, जांब 3, अमृतवाडी 3, देगाव 1, बोपेगाव 7, कवटे 4, पसरणी 4, सुरुर 1, कोहिनूर रेसीडेन्सी वाई 3, वारखडवाडी 1, पाचपुतेवाडी 1, बोपर्डी 1, बावधन नाका 1, बोरगाव 1, सिद्धनाथवाडी 4, पिराचीवाडी 1, मेणवली 3, धावडी 1, यशवंतनगर 5, कुसगाव 1, इकसर 1, गंगापुरी 1, नावेचीवाडी 1, एमआयडीसी 1, मधली आळी वाई 2, धरमपुरी 2, सह्याद्रीनगर 2, रामडोह आळी 1, किकली 1, भुईंज 1, ब्राम्हणशाही 1, गणपत आळी वाई 3, घावनवाडी 1, वेरुळी 1, व्याजवाडी 1, सह्याद्रीनगर 1,
महाबळेश्वर तालुक्यातील माने गल्ली पाचगणी 8, गोडोली 8, पाचगणी 8, ताकवली 2, तापोळा 2 इतर 28
बाहेर जिल्ह्यातील इस्लामपूर जि. सांगली 1, येडेमच्छींद्र जि. सांगली 1, वाटेगाव ता. वाळवा 2, रेठरे ता. वाळवा 1, विटा जि. सांगली 1, नवी मुंबई 1, पुणे 1, बेलापूर मुंबई 1,
11 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे आसनगांव सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, विकासनगर सातारा येथील 65 वर्षीय महिला, राजेवाडी निगडी येथील 52 वर्षीय पुरुष, महागांव येथील 70 वर्षीय पुरुष, शिवथर येथील 85 वर्षीय पुरुष, वडूज येथील 72 वर्षीय महिला, पाटखळ येथील 65 वर्षीय महिला, पाल ता.कराड येथील 70 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये यशवंतनगर, वाई येथील 70 वर्षीय पुरुष, खडकी ता. वाई येथील 52 वर्षीय पुरुष, काळगांव ता.कराड येथील 42 वर्षीय पुरुष, असे एकूण 11 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
शनिवार पर्यंतघेतलेले एकूण नमुने 48264
एकूण बाधित 17663
घरी सोडण्यात आलेले 9774
मृत्यू 473
उपचारार्थ रुग्ण 7416