सदरबाजार, गोडोली, विकासनगर हॉटस्पॉट
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना बाधित रुग्णांच्या वाढीचा वेग सातारा शहरात मोठय़ा प्रमाणात आहे. शहरात उद्रेक झाला असून शहरातील सदरबाजार, विकासनगर, गोडोली या भागात रुग्ण वाढीचे प्रमाण मोठे असल्याने तो परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला आहे.होम आयसोलेशनमध्ये सातारा शहरात 982 जण असून ग्रामीण भागातील 1027 असे तालुक्यात 2252 जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. दि.27रोजीच्या अहवालात सातारा तालुक्यातील 12 जणांचा मृत्यू दाखवले गेले असून त्यातील 6 जण हे तालुक्यातील आहेत तर 6 जण हे उपचार तालुक्यात घेणारे होते. 507 जण कोरोनाच्या विळख्यात नव्याने सापडले आहेत.
सातारा शहराची लोकसंख्या 1 लाख 71 हजार तर ग्रामीण भागाची 3 लाख 65 हजार308 अशी सातारा तालुक्याची 5 लाख 36 हजार308 एवढी आहे. कोरोनाच्या विळख्यात गतवर्षीपासून सातारा तालुका अडकला आहे. आतापर्यंत शहरातील 52 हजार366 जणांचे तर ग्रामीण भागातील 58 हजार569 असे 1 लाख 10 हजार935 जणांचे स्वाब तपासणी करण्यात आले. कोरोनाचा स्प्रेड काही केल्या सातारा तालुक्यात थांबेना झाला असून आतापर्यंत 22 हजार674 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. दि.27रोजीच्या अहवालात सातारा तालुक्यात 507 जण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. तर मृत्यू झालेत 12 जण.मृत्यू झालेल्या 12 जणांमध्ये एकही सातारा शहरातील नाही तर 6 जण हे तालुक्यातील आहेत.यातील एक ठोसेघर आरोग्य केंद्र, 1 नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्र, 2 लिंब प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 2 कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणाया गावातील बाधितांचा मृत्यू झाला आहे.उरलेले 6 मृत्यू तालुक्यातील नाहीत, असे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.
हॉटस्पॉट शहरातले पूर्व भाग
सातारा शहरात कोरोनाचा स्प्रेड थांबत नाही.आता थोडी कडक नियमावली केल्याने शहरातील बाधित होण्याची परंपरा खंडित होईल अशी शक्यता वर्तवली जात असून दि.23 पर्यत सातारा शहरातील सदरबाजारमध्ये 34 रुग्ण होते, विकासनगरमध्ये 25 रुग्ण होते तर गोडोलीत 91 रुग्ण होते.ग्रामीण भागात प्रामुख्याने गोजेगाव 11, खोजेवाडीत 32, खेडमध्ये 21, कोडोलीत 71 तर पाडळीत 11 बाधित असल्याने त्या भागात हॉटस्पॉट आहेत.
सातारा शहरात आतापर्यंत 1022 कंटेंटमेंट झोन
सातारा शहरात आतापर्यंत 1हजार22 ठिकाणी कंटेंटमेंट झोन असून त्यात 152हे सातारा शहरातील ऍक्टिव्ह झोन आहेत.तर सातारा तालुक्यातील 129 एक्टिव्ह झोन तर ग्रामीण आतापर्यंत 1366 कंटेंटमेंट झोन असून एकूण आतापर्यंत 2388 ठिकाणी कंटेंटमेंट झोन आहेत. त्यात शहरात ऍक्टिव्ह रुग्ण 247 एवढे असून होम आयसोलेशनमध्ये 982 एवढे आहेत.ग्रामीण भागात 1027 होम आयसोलेशनमध्ये आहेत असे 2252 एवढे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.