गोडोली / प्रतिनिधी :
शिवसैनिक आणि सामाजिक कार्यात ठसा उमठविणारे निलेश मोरे यांची सातारा शहर प्रमुखपदी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. शनिवारी (दि.6) मुंबई येथे शिवसेना भवनात पक्षाने राज्य समन्वयक दगडूदादा सकपाळ, ना.नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र दिले.
भविष्यात सातारा नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणूकीच्या दृष्टीकोनातून शिवसेना सातारा शहर संघटन बांधणी केली जात आहे. शहरातील अनेक कार्यकर्ते सध्या पक्षाच्या संपर्कात असून संघटनेत महत्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत. सातारा नगरपालिकेत सत्ता प्रस्थापित करण्यासाठी नव्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करून शहरात पक्ष सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निलेश मोरे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सातारा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, शंकर संकपाळ, नारायण निकम, प्रवीण शिंदे, तालुका प्रमुख अनिल गुजर,राम घोरपडे,निलेश चित्रकार यांच्या सह शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.