प्रतिनिधी /बेळगाव
सादसंगत गुरुद्वारातर्फे गुरुनानक यांची 553 वी जयंती गोवावेसजवळील गुरुद्वारामध्ये साजरी करण्यात आली. शीख बांधव हा दिवस प्रकाशपर्व म्हणूनही साजरा करतात. यानिमित्त गुरुद्वारामध्ये सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, शब्द कीर्तन व ग्रंथसाहिब पठण झाले. दुपारी लंगर म्हणजे महाप्रसाद झाला. यावेळी शीख बांधवांसह अन्य समाजबांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.