रुग्णसंख्या 279 वर, आणखी दोघांना डिस्चार्ज : जिह्यात एकूण 240 ‘कोरोना’मुक्त : सक्रिय रुग्णांची संख्या 33
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिह्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ‘कोरोना’ बाधित रुग्णांची संख्या 279 वर गेली आहे. तर रविवारी आणखी दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिह्यात आजपर्यंत 240 कोरोना ‘बाधित’ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिह्यात 33 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिह्यात शनिवारी रात्री उशिरा तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर रविवारी सकाळी एक तर सायंकाळी तीन अहवाल पॉझिटिव्ह झाले. शनिवारच्या अहवालात कणकवली तालुक्यातील कासार्डे एक आणि कुर्ली एक तर कुडाळ तालुक्यातील ओरोस येथील एकाचा समावेश आहे. तर रविवारच्या अहवालात पणदूर येथील एकाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. रविवारी उशिरा आढळलेल्या तिघांमध्ये कणकवली शहर एक, पावशी एक आणि कुडाळ येथील एकाचा समावेश आहे.
ओरोसमध्ये ‘कोरोना’चा शिरकाव
जिह्यात सापडलेले सर्वच रुग्ण उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी-ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले जातात. असे असूनही नागरिकांच्या जागरुकतेमुळे ओरोस किंवा सिंधुदुर्गनगरीत आतापर्यंत एकही ‘कोरोना’बाधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आता ओरोस गावात ‘कोरोना’चा शिरकाव झाला असून एक रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण पुणे येथून प्रवास करून आला होता
अ. क्र. विषय संख्या
1 तपासण्यात आलेले एकूण नमुने 4,667
2 अहवाल प्राप्त झालेले नमुने 4,613
3 आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 279
4 निगेटिव्ह आलेले नमुने 4,332
5 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 54
6 सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 33
7 उपचारासाठी जिह्याबाहेर गेलेले रुग्ण 1 (मुंबई)
8 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
9 डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 240
10 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 56
11 रविवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 3,708
12 संस्थात्मक विलगीकरणातील एकूण व्यक्ती 14,358