प्रतिनिधी/ बेळगाव
सुळगा-येळ्ळूर येथील पावसामुळे घरे कोसळून जवळपास 10 लाखांचे नुकसान झाले. या घटनेमुळे गरीब कुटुंबीय उघडय़ावर पडली आहेत. तेव्हा त्या गरीब कुटुंबांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.
नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे सुळगे येथील भावकेश्वरी गल्लीतील बुधाजी कुंडेकर आणि परशराम कुंडेकर यांचे घर कोसळले. पाटील गल्लीतील नारायण पाटील यांचेही घर कोसळले. ही घरे कोसळल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा फटका बसला आहे. तेव्हा तातडीने सर्व्हे करून संबंधितांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.