प्रतिनिधी / वैराग
वैराग येथील नविन मराठी विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या आठ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे. तर यामध्ये एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी 76 होते. त्यातील 55 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून, आठ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे. शिष्यवृत्तीच्या परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे
गोविंद यादव, सृष्टी गुंड, अभिजीत मोहिते, अनय कल्याणी, कीर्तीक पाटील, शर्वरी जाधव , वृषाली मोरे , वेदांत जाधव, या विदयार्थ्यांनी गुणवत्ता यादीत यश मिळवले.या विदयार्थ्यांना शिक्षक गवळी बी .एल. यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन संस्था सचिव बाळासाहेब कोरके, डॅा. कपील कोरके, माजी जि.प. सदस्या सुरेखा कोरके, मुख्याध्यापक वैशाली पाटील व सर्व शिक्षंकानी अभिनंदन केले.