प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज गुरूवारी 149 नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 145 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 149 पैकी 96 पुरुष, 53 स्त्रियांचा समावेश आहे. आज 2 तर आतापर्यंत 1047 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 35 हजार 889 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 634 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2292 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2144 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 149 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1047 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 33 हजार 208 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1161
मंगळवेढा- 1623
बार्शी – 6316
माढा- 3785
माळशिरस – 6521
मोहोळ- 1752
उत्तर सोलापूर – 792
करमाळा- 2230
सांगोला – 2792
पंढरपूर 7395
दक्षिण सोलापूर – 1522
एकूण – 35, 889
होम क्वांरटाईन – 12012
एकूण तपासणी व्यक्ती- 332883
प्राप्त अहवाल- 332832
प्रलंबित अहवाल- 51
एकूण निगेटिव्ह – 296944
कोरोनाबाधितांची संख्या- 35,889
रुग्णालयात दाखल – 1634
आतापर्यंत बरे – 33,208
मृत – 1047