प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक आणि उत्तराधिकारी संघ यांच्यावतीने रविवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये विवेकानंद पोटे, किरण बेकवाड यांनी विचार मांडले. दिलीप सोहनी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश अष्टेकर, शंकर गिरी, हलगेकर व संस्थेचे सभासद उपस्थित होते.