ऑनलाईन टीम / केलांग :
हिमाचल प्रदेशमधील लाहौल खोऱ्यातील थोरंग गावात एक व्यक्ती सोडून इतर 42 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मनाली-लेह महामार्गावर असलेल्या थोरंग गावात केवळ 42 लोक राहतात. कोरोनाची लागण न झालेल्या व्यक्तीचे नाव भूषण ठाकूर असे आहे. भूषण यांच्या पत्नीसह घरातील 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात आधी 52 वर्षांच्या भूषण यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गावातील इतरांनीही कोरोना चाचणी केली. त्यानंतर केवळ एक व्यक्ती सोडून गावातील इतर सर्व व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सध्या लाहौल हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक कोरोना बाधित असलेला जिल्हा बनला आहे.
दरम्यान, लाहौल खोऱ्यातील वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे. रोहतांग सुरंगच्या उत्तरेकडील तेलिंग पर्यंतच पर्यटकांना येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.