नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
हिमाचल प्रदेशमधील किनौरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांनी भरलेल्या बसवर ही दरड कोसळली आहे. तसेच या दरडीमध्ये इतर अन्य वाहनेही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पीओ-शिमला महामार्गावर ही दरड कोसळली. महामार्गावरुवन जाणाऱ्या एचआरसीटी बस, कार आणि ट्रकवर ही दरड कोसळली आणि दरडीखाली वाहने संपूर्णपणे गाढली गेली. ढिगाऱ्याखाली तब्बल ५०-६० लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात.
किनौर जिल्ह्यातील मंगूर हरिद्वार मार्गावरील ही बस होती. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बस चालक आणि कंडक्टरसह ४ जणांंचे रेस्क्यू करण्यात असल्याची माहिती हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली आहे. रेस्क्यू करण्यात आलेल्या ४ जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलिसांची टीम तैनात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये जवळपास ३५ ते ४० प्रवासी होते. दुपारी १२:४५ च्या दरम्यान ही घटना घडली आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि NDRF कडून तिथे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याशी बाबचीत करुन घटनेचा आढावा घेतला असून गरज लागल्यास मदत करण्याचे आश्वासन देखील दिले आहे.