माद्रीद
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रूमानियाच्या माजी टॉप सीडेड सिमोना हॅलेपने एकेरीची तिसरी फेरी गाठताना द्वितीय मानांकित बेडोसाचा पराभव केला. त्याचप्रमाणे टय़ुनेशियाच्या जेबॉरने तिसऱया फेरीत स्थान मिळविताना ग्रेचेव्हावर मात केली.
दुसऱया फेरीतील झालेल्या सामन्यात हॅलेपने बेडोसाचा 6-3, 6-1 तसेच टय़ुनेशियाच्या जेबॉरने ग्रेचेव्हाचा 7-5, 0-6, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या बेनसिकने मुचोव्हाचा 6-3, 4-6, 7-5, बेलारूसच्या अझारेंकाने झिदानसेकचा 3-6, 6-1, 6-3, ऍनीसिमोव्हाने मार्टिकचा 3-6, 6-3, 6-2 असा पराभव केला.