वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोरोना विषाणूमुळे देशभरात थैमान घातले असल्याने अनेक महत्वपूर्ण स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु यादरम्यान, भारतीय चाहत्यांसाठी एक आनंददायी बातमी मिळाली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला असून आयसीसीने याबाबतची माहिती दिली. ही स्पर्धा पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये 6 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे.
आयसीसीच्या तांत्रिक समितीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये यजमान न्यूझीलंडसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व भारत या संघांना थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, सध्याच्या घडीला वनडे क्रमवारीत ऑस्ट्रेलियन संघ 37 गुणासह पहिल्या, इंग्लंड 29 गुणासह दुसऱया, द.आफ्रिकन संघ 25 गुणासह तिसऱया तर भारतीय संघ 23 गुणांसह चौथ्या स्थानी विराजमान आहे. या निकषानुसार हे सर्व चारही संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले.
यासाठी 2017 ते 2020 या कालावधीतील या संघांच्या कामगिरीचा विचार करण्यात आला. भारतीय महिला संघाने वनडे चॅम्पियनशिमध्ये 21 पैकी 10 सामने जिंकले तर 8 सामने गमावले. याशिवाय, 2019 मध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विंडीजविरुद्ध वनडे मालिका 2-1 फरकाने जिंकली. या कामगिरीमुळे टीम इंडियाला वनडे क्रमवारीत चौथे स्थान राखता आले.
कोरोनामुळे लंकेतील पात्रता फेरीचे सामने रद्द
आकासीसी विश्वऍाषवढ पात्रता पेढरीऍाs सामने काावर्षी 3 ते 19 जुलै दरम्काान ूााrलंवेढत खेळवले जाणार होते. काा स्पर्धेत ूााrलंवढा, पाविढस्तान, वेस्ट इंडीज, बांगलादेश, आकालआड, थाकालंड, झिम्बाब्वे, पापुआ न्काt गिनी, अमेरिवढा आणि हॉलंड काा देशांऍाा सहभाग होता. पण जगातील वढाsरोना विषाणूऍाs थैमान पाहता आकासीसीने हे सर्व सामने लांबणीवर टावढले आहेत. विश्वऍाषवढासाठी पाऍा संघ पात्र ठरले असून उर्वरित तीन जागांसाठी दहा संघ पात्रता स्पर्धेत एवढमेवढांशी भिडणार आहेत. कााबाबतऍाs नवे वेळापत्रवढ लववढरऍा जाहीर वढरण्काात काsईल, असेही आकासीसीने स्पष्ट वेढले.