क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित आव्हान टू के 22 सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्सवात प्रारंभ झाला.
आरपीडी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या प्रमुख मनीषा नेसरकर, एसकेई सोसायटीचे व्हाईस चेअरमन एस. वाय. प्रभू, आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयाचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश कलघटगी, प्राचार्य के. बी. मलेद, जी. व्ही. हलगेकर, एस. एस. बिजापूर, क्रीडा प्राध्यापक देवेंद्र कुडची आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या क्रीडा प्रकारात कबड्डीr, व्हॉलीबॉल, 100 मी. धावणे, 4×100, गोळा फेक, थाळी फेक आदी खेळांचा समावेश आहे. या क्रीडा प्रकारात बेळगावातील अनेक शाळांनी भाग घेतला असून गुरुवारी या महोत्सवाची सांगता होणार आहे. कबड्डी स्पर्धेत जवळपास 25 मुला-मुलींच्या संघांनी तर व्हॉलीबॉल स्पर्धेत 22 मुला-मुलींच्या संघांनी भाग घेतला आहे. या सांगता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, समीर मजली, एस. वाय. प्रभू, डी. बी. कलघटगी, आनंद सोमनाचे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.