
नवी दिल्ली : आर्थिक संकटाचा सामना करणाऱया एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीला कर्मचाऱयांच्या वेतनात 30 टक्के कपात करावी लागणार असल्याची शक्मयता वर्तविली जात आहे. कोरोनामुळे सध्या हवाई वाहतूक गेले तीन महिने बंद असल्याकारणाने अनेक विमान कंपन्यांना आर्थिक फटका मोठय़ा प्रमाणात बसला आहे. सध्याला कंपनी खर्चात कपातीचे सर्व उपाय अवलंबत असून याचाच एक भाग म्हणून कर्मचाऱयांचे वेतन 30 टक्के इतके कमी करण्याचा विचार केला जात आहे. काही कर्मचाऱयांना नारळही दिला जाण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. दरम्यान दुसरीकडे इंडिगो या विमान कंपनीने 10 टक्के कर्मचारी कपात करण्याचे निश्चित केले असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीला कोरोनाच्या काळात जबर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यातूनच कंपनीने कर्मचाऱयांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते.
डुकाटी पॅनिगले व्ही 2 मोटारसायकलचे

नवी दिल्ली : इटलीतील कंपनी डुकाटी आपली नवी पॅनिगले व्ही 2 ही मोटारसायकल लवकरच भारतात लाँच करणार आहे. लाँचपूर्वी या गाडीच्या बुकिंगचा धडाक्मयात शुभारंभ झाला आहे. ग्राहकांची बऱयाच दिवसांपासून असलेली प्रतिक्षा अखेर संपणार आहे. लवकरच ही गाडी भारतात दाखल होणार आहे. दिल्ली, एनसीआर, पुणे, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळूर, कोची, कोलकाता आणि चेन्नई येथील डुकाटी इंडियाच्या विपेत्यांकडे एक लाख रुपये भरून नव्या गाडीचे बुकिंग करता येणार आहे. ही गाडी भारतीय बाजारात उतरण्याची ग्राहक आतुरतेने वाट पाहात आहेत.
शाओमीचा रेडमी नोट 9 बाजारात

मुंबई : स्मार्टफोन क्षेत्रातली आघाडीवरची कंपनी शाओमीने आपला नवा रेडमी नोट 9 हा फोन बाजारात दाखल केला आहे. 6.53 इंच फुल्ल एचडी डॉट डिस्प्लेसह 5020 एमएएच बॅटरीसह असणारा हा स्मार्टफोन 13 एमपी कॅमेऱयाचा आहे. हा फोन सर्वात जलद चार्ज होतो असा कंपनीचा दावा आहे. फिंगरपिंट सेन्सरचीही व्यवस्था या फोनमध्ये असणार आहे. अँड्रॉइड 10 ऑपरेटींग सिस्टमचा हा फोन अक्वा ग्रीन, आर्टिक व्हाइट आणि पेबल ग्रे रंगात उपलब्ध आहे.