ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई कोणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे हिम्मत असेल तर अडवून दाखवा…असे खुले आव्हान देणारी बॉलिवूड अभिनेत्री आज मुंबईत येत आहे. मुंबईत येण्यापूर्वी कंगनाने दुसऱ्यांदा कोरोनाची चाचणी केली असून त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे ती मुंबईत येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंगना मंडीहून चंदीगडला यायला निघाली आहे. त्यानंतर चंदीगड मधून ती दुपारी 12.15 च्या फ्लाईटने मुंबईत दाखल होणार आहे. आता पुढे काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्या स्तरावरून तिच्यावर टीका होत आहे. शिवसेने तर तिच्याविरोधात जोडेमारो आंदोलनही केले होते.
त्या दरम्यान, कंगनाने एक ट्विट केले आणि ती त्या ट्विटमध्ये म्हणाली की, अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण आता मी मुंबईत येणारच आहे. येत्या 9 सप्टेंबरला मी मुंबईत येणार हे नक्की आहे. वेळही मी कळवेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावे, असे म्हटले होते.
आता ठरल्याप्रमाणे ती आज मुंबईत दाखल होणार आहे. अशातच कंगनाच्या मुंबई दौऱ्यासाठी कंगनाला केंद्रीय गृहमंत्र्यांकडून कंगनाला ‘वाय’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईला निघण्यापूर्वी आज सकाळी कंगनाने आणखी एक ट्वीट केले आहे.
- ना डरुंगी… ना झुकूंगी…

त्यामध्ये ती म्हणाली आहे की, ‘राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी’. असे म्हटले आहे.