कतरिना कैफचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आता तिची मुख्य भूमिका असलेल्या एका आगामी चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साळी करणार असल्याचे समजते. मध्यंतरी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि आलिया भटची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात ती आयटम साँग करणार असल्याची चर्चा होती. पण यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कतरिनाच्या आधी प्रियंका चोप्रा ‘जोनास’ हे गाणे करणार असल्याचेही बोलले जात होते. पण ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण हेही खोटे असल्याचे नंतर स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये कतरिनाने भेट दिली होती. तेव्हापासून ती आयटम साँग करणार असल्याचे बोलले जात होते. पण संजय लीला भन्साळी आणि कतरिना कैफ हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असून कतरिना तिच्या आगामी चित्रपटाची चर्चा करण्यासाठी संजय लीला भन्साळी यांना भेटली होती, हे समोर आले आहे.
Previous Articleकंगना करणार 20 किलो वजन कमी
Next Article क्रितीने पूर्ण केले ‘मिमी’चे शूटिंग
Related Posts
Add A Comment