गाडीत बसून घेता येणार स्ट्रीड फूडचा आनंद
कोरोना संकटामुळे दीड वर्षापासून लोक घरांमध्ये कैद झाले आहेत. आवश्यक कामांच्या व्यतिरिक्त लोकांना घराबाहेर पडणे अवघड ठरले आहे. स्ट्रीट फूडचा आनंद घेणे तर दूरची गोष्ट ठरली आहे. पण केरळ पर्यटन मंत्रालयाने लोकांना पुन्हा तेच वातावरण प्रदान करण्यासाठी एक विशेष पाऊल उचलले आहे. राज्यात इन-कार डायनिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यांतर्गत पर्यटकांना त्यांच्या वाहनातच खाद्यपदार्थ पुरविले जातील. अशाप्रकारे लोक घरांबाहेर पडून खाण्यापिण्याचा आनंद घेऊ शकतील आणि कोरोना संक्रमणाच्या धोक्यपासून देखील सुरक्षित राहतील.

कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी भोजन करतेवेळी आरोग्य विषयक जोखीम करण्याची आवश्यकता विचारात घेत केरळ पर्यटन विकास महामंडळ लवकरच ‘इन-कार डायनिंग’ सुविधा सुरू करणार आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत ग्राहक स्वतःच्या वाहनांमध्ये बसून केटीडीसीच्या आहार रेस्टॉरंट्सना स्वतःची ऑर्डर देऊ शकतील आणि ऑर्डर त्यांना त्यांच्या वाहनातच प्राप्त होईल अशी माहिती केरळचे पर्यटनमंत्री पी.ए. मोहम्मद रियास यांनी दिली आहे.
सार्वजनिक सुरक्षेतील धोके पाहूनच योजना लागू केली जाणार आहे. महामारीच्या दुसऱया लाटेनंतर पर्यटन उद्योगाला या पुढाकारामुळे वेग पकडण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. ‘फेसलिफ्ट मिशन’ अंतर्गत केटीडीसी हॉटेल साखळीला प्राथमिकतेच्या आधारावर वर्गीकृत करत त्यांचे नुतनीकरण करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. राज्यातील काही निवडक ठिकाणी फ्लोटिंग रेस्टॉरंट्स स्थापन करण्याची योजना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.