ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ खाली येताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 10 हजार 219 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 21 हजार 081 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

दरम्यान, कालच्या दिवशी 154 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.72 % इतके आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 55 लाख 64 हजार 348 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 94.25% इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 1,74, 320 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 66 लाख 96 हजार 139 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 42 हजार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 12 लाख 47 हजार 033 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 6 हजार 323 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
- महाराष्ट्र : ‘ब्लॅक फंगस’ रुग्णांची संख्या 6,384 वर
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. असे असले तरी दुसरीकडे पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ‘ब्लॅक फंगस’ या आजाराने राज्यात अक्षरशः थैमान घालण्यास सुरूवात केली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत ‘ब्लॅक फंगस’ चे 6 हजार 384 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 523 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली.