लोकोळीत शिवकन्या संघातर्फे मान्यवरांचा सत्कार – क्रीडा स्पर्धा उत्साहात : गर्लगुंजी माऊली हायस्कूल खो-खोमध्ये प्रथम
वार्ताहर /खानापूर
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात महिला अग्रेसर होत चालले आहेत. महिलांच्या उत्कर्षासाठी शासनानेही अनेक योजना राबवल्या आहेत. खेडय़ापाडय़ातील महिला शिक्षणाबरोबर समाजातील दिल दलितांच्या उत्कर्षासाठी तसेच समाजाला आदर्श ठरत आहेत. लोकोळीतील युवती तसेच महिलांनी विविध कला क्षेत्रामध्ये अग्रेसर राहून मान उंचावला आहे. महिला संघाने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून तालुक्मयात आदर्शच निर्माण केला असून हाच आदर्श तालुक्मयातील प्रत्येक गावात तरुण युतीने घ्यावा, असे आवाहन निवृत्त कॅ. बाळकृष्ण पाटील यांनी व्यक्त केले. नुकताच लोकोळी येथील शिवकन्या संघाच्यावतीने विविध क्रीडा स्पर्धा तसेच मराठी प्राथमिक शाळेतील आजी-माजी शिक्षकांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपाध्यक्ष रमेश गुरव, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर तसेच महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या जयश्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी लोकुर येथील मराठी प्राथमिक शाळेच्या आजी-माजी शिक्षकांचा तसेच गावातील निवृत्त शिक्षकांचा शिवकन्या संघाच्यावतीने श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी शिवकन्या संघाच्यावतीने तालुक्मयातील मुलींसाठी खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्मयातील अनेक संघांनी सहभाग दर्शवला होता. यामध्ये गर्लगुंजी येथील माऊली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी खो-खो मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर चापगाव येथील मलप्रभा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय तर धोंडदेव ग्रुप करंबळ येथील महिला संघाने तृतीय क्रमांक पटकावला. खो खो स्पर्धेमध्ये शिवकन्या लोकोळी संघानी प्रथम, बीएसए ग्रुप मुतगा यांनी द्वितीय तर शिवराय ग्रुप खानापूर या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.रिले स्पर्धेमध्ये माऊली हायस्कूल गर्लगुंजी प्रथम, बीएससी ग्रुप मुतगा द्वितीय तर येथील शाळेच्या विद्यार्थिनीनी तृतीय क्रमांक पटकावला. सूत्रसंचालन निकिता पाटील हिने केले तर आभार आनंद जाधव यांनी मानले. निरीक्षक म्हणून एस. वाय. पाटील व पी. बी. अंबाजी यांनी काम पाहिले.