प्रतिनिधी/ खानापूर
कोरोनामुळे खानापूर तालुक्मयातील जनतेमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. शहरासह तालुक्मयाच्या ग्रामीण भागातही सरकारी आदेशाचे कडक पालन केले जात आहे. बाहेर पडताना मास्कचा वापर प्रत्येकाकडून केला जात आहे.
दिल्लीतील तबलिग जमातच्या कार्यक्रमात तालुक्मयातून अकरा जण सहभागी झाल्याचे उघडकीस आले होते. या अकराही जणांचा शोध घेऊन पोलीस यंत्रणा व आरोग्य खात्याच्यावतीने त्यांची चौकशी करण्यात आली असता ते सर्वजण फेब्रुवारी महिन्यातच दिल्लीहून खानापूरला परतले असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आरोग्य खात्याकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर पोलीस खात्याने विशेष नजर ठेवली आहे. तर दुसरीकडे तालुक्मयातील हलसाल गावात दुबईहून परतलेल्या एकाला तपासणीसाठी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्मयात सध्या तरी कोरोनाचा कोणताही धोका नाही. तरीही प्रत्येकाने याबाबत विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे.
स्वच्छतेला प्राधान्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर शहर व तालुक्मयात स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिले जात आहे. खानापूर शहरात नगरपंचायतीने अग्निशमन दलाच्या मदतीने रोगप्रतिबंधक औषधांची फवारणी केली. याशिवाय श्रीराम सेना हिंदुस्थान तसेच आजी-माजी नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक विनायक कलाल, श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख पंडित ओगले, माजी नगरसेवक दिनकर मरगाळे, राहुल सावंत, राजू गावडे, ज्ञानेश्वर देवलतकर, किरण तुडयेकर, रघुनाथ गुरव, निलेश कुंभार, साहिल ओगले, लक्ष्मण यळ्ळूरकर, संजय मयेकर व इतरांचा समावेश आहे. याशिवाय तालुक्मयातील प्रत्येक ग्राम पंचायत क्षेत्रातही परिसर स्वच्छतेवर भर देण्यात आला असून त्या ठिकाणीही जंतूनाशक औषधांची फवारणी सुरू आहे.
खासगी दवाखाने सुरू
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर खानापूर शहरातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. त्यामुळे खानापूर व शहर परिसरातील सामान्य रुग्णांची अडचण झाली होती. साहजीकच यामुळे सरकारी दवाखान्यात मोठी गर्दी होत होती. यामुळे खासगी दवाखाने सुरू व्हावेत, अशी मागणी वाढली होती. याची दखल खानापूर तालुका खासगी डॉक्टर संघटनेने घेतली. आता खानापूर शहरातील सर्व खासगी दवाखाने सुरू झाले आहेत.
आमदारांची आज आढावा बैठक
खानापूर येथे शुक्रवार दि. 3 रोजी दुपारी 3 वाजता तालुका पंचायत कार्यालयासमोरील जागेमध्ये आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी कोरोनासंदर्भात आढावा बैठक बोलावली आहे. सर्व सरकारी कर्मचाऱयांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.