प्रतिनिधी/ बेळगाव
एस.के.ई. सोसायटीतर्फे प्रा. डॉ. शोभा नाईक यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. नाईक या एस.के.ई सोसायटीच्या आरपीडी महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कविता, समीक्षा संशोधन आणि भाषांतर या साहित्य प्रकारात त्या लेखन करतात. त्यांना 10 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन आर. डी. शानभाग, व्हा. चेअरमन पंकज शिवलकर, आर. बी. देशपांडे, खजिनदार बी. एस. कलघटगी व प्रा. एस. वाय. प्रभू उपस्थित होते.