वातावरण बदलाचा परिणाम तरीही कोरोना चाचणी सक्तीची
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील अनेक भागात लहान मुलांसह मोठय़ांना देखील तापाच्या साथीने ग्रासले असून तो ताप कोरोनाचा नसल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या साथीमध्ये ताप येणे हे प्रमुख लक्षण असल्याने या तापामुळे मुलांचे पालक चिंताग्रस्त झाले असून तापासणी केल्यानंतर मात्र तो ताप म्हणजे कोरोना नव्हे असे स्पष्ट झाले आहे.
लहान मुलांमध्ये या साथीच्या तापाचे प्रमाण जास्त असल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण असून ताप आला असला तरी त्यांना कोरोनाची लागण नसल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी नमूद केले आहे. खासगी डॉक्टर्सकडे अशा ताप असलेल्या रुग्णांची गर्दी वाढल्याचे दिसून येते. सरकारी इस्पितळे, आरोग्य केंद्रे येथेही तापाच्या तक्रारी घेऊन लोक येत असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
सध्या गोव्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असून सर्व जनजीवन, व्यवहार सुरळीतपणे चालू आहेत. अशा वेळी तापाचे लहान – मोठय़ा वयाचे रुग्ण वाढल्याने कोरोना लाट आली की काय? अशी भीती सतावत होती. तथापी चाचणीनंतर तो ताप कोरोनाचा नसल्याचे स्पष्ट झाल्याने एकंदरित पालक – जनतेला हायसे वाटले आहे.
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा संभव असल्याने लहान मुलांना तापाचे लक्षण दिसले तर तातडीने तपासणी करुन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधोपचार करावेत असे निर्देश आरोग्य खात्याने दिले आहेत. तापाचे प्रमाण वाढताना दिसत असून सरकारने आरोग्य खात्याने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.
वातावरण बदलाचा परिणाम, काळजी घ्यावी काही दिवस पाऊस व त्यानंतर गेले काही दिवस कमालीचा उकाडा यामुळे वातावरणात बदल घडला असून त्याचा परिणाम म्हणून सदर तापाची साथ उदभवल्याचे काही डॉक्टर्सचे म्हणणे आहे. परंतु तो ताप म्हणजे कोरोना नसला तरी त्याचे लक्षण दिसल्यास कोरोनाची तपासणी करुन घेणे आवश्यक असल्याची सूचना आरोग्य खात्याने केली आहे. या तापामुळे राज्यातील जनतेने कोरोनाचा गैरसमज करुन घेऊ नये व तापावर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधे