वार्ताहर / गोकुळ शिरगाव
तामगाव (ता करवीर ) येथील महालक्ष्मी गृह लघु उद्योग येथे आज सायंकाळी साडेपाच वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व महसूल विभाग यांनी रेशन धान्य असल्याच्या संशयावरून कारवाई करत येथील महालक्ष्मी गृह लघुउद्योग आटा चक्की मिलवर छापा टाकून 25 टन तांदूळ व एक टन गहू असा सात लाख किमतीचा माल जप्त करून गोडाऊन सील केले ले आहे.
पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे स.पो नी प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व करवीरच्या तहसीलदार शितल मुळे भामरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.