नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आणि कामगिरीचं सर्वेक्षण इंडिया टुडे या माध्यम समुहाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यामध्ये, देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये एम.के. स्टॅलिन , शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा समावेश आहे. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे हे चौथ्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. याबाबत, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आनंद अन् अभिमान व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरे आता टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. लवकरच ते टॉप वन होतील , असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला.
यावेळी संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, उद्धव ठाकरे प्रत्येक सर्व्हेत टॉप टेन आणि टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. आता ते टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. लवकरच ते टॉप वन होतील. आमचे राजकीय विरोधक काहीही म्हणून द्या. ते म्हणतील हा कसला पोल? असा पोल असतो का? ते काहीही म्हणून द्या. जेव्हा तुमच्याबाबतीत पोल येत होते, तेव्हा तुम्ही त्याचे ढोल आणि झांजा वाजवत होता. आता आम्हीही फटाके फोडू. आमचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आणि गर्व वाटावं असं नेतृत्व आहे. त्यांचं काम उत्तम चालू आहे.
यावेळी संजय राऊत यांनी भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर जोरदार टीका केली आहे. सध्या ज्या प्रकारे गर्दीचं नियोजन करताय शक्ती प्रदर्शनासाठी… हे एकप्रकारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. राज्याच्या मुखअयमंत्र्यांनी इशारा दिला आहे. पण हे मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्यासाठी…पण ठिक आहे काही अडचण नाही. पण तुम्ही किमान संयम पाळा एवढंच मला म्हणायचं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
इंडिया टुडे या माध्यम समुहाच्या या सर्वेक्षणात भाजपला चांगलाच झटका बसला आहे. देशातील सर्वात लोकप्रिय असलेल्या 11 मुख्यमंत्र्यांमध्ये 9 मुख्यमंत्री हे भाजपेत्तर पक्षाचे आहेत. योगी आदित्यनाथ यांनाही केवळ 29 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत एम.के. स्टॅलिन यांना पहिली पसंती मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर नवीन पटनायक यांना स्थान मिळाले आहे. केरळचे पिनराईन विजयन, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींना अनुक्रमे 3, 4 आणि 5 वे स्थान मिळाले आहे. अकरा जणांच्या या यादीत भाजपचे केवळ 2 मुख्यमंत्री असून हेमंत बिस्वा आणि योगी आदित्यनाथ यांना स्थान मिळाले आहे.
Trending
- होऊ द्यायचं नाही, होवू देणार नाही अशी भूमिका खपवून घेणार नाही ; राजेश क्षीरसागरांचा इशारा
- बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा; येत्या अधिवेशनात आणणार कायदा
- कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा होताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी कटिबद्ध आहे…
- पवार साहेबांनी टाकलेला विश्वास नवनिर्वाचीत पदाधिकारी सार्थ ठरवतील ; अजित पवार
- अखेर पवारांनी भाकरी फिरवली; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष
- Kolhapur Breaking : बालिंगे कात्यायनी ज्वेलर्स दरोडा प्रकरण : दोघे संशयित ताब्यात
- …तर तुमची झोप उडवली जाईल ; रोहित पवार यांचा इशारा
- गोव्यातील जुगार फसवणूक प्रकरणातून एकाची आत्महत्या