चलवादी महासभेचे आमदार एच. के. कुमारस्वामी यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
डॉ. बाबासाहेब निगम मंडळामधून दीन-दलितांना निधी मिळत नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने निधी मिळावा यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी चलवादी महासभेच्यावतीने मुडगेरेचे आमदार एच. के. कुमारस्वामी यांच्याकडे करण्यात आली. त्यावर निश्चितच विशेष निधी उपलब्ध करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
चलवादी महासभेच्यावतीने वधू-वर सूचक केंद्र स्थापन करण्यात आले. त्याचे उद्घाटन करण्यासाठी आमदार एच. के. कुमारस्वामी आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी राहुल मेत्री यांच्यासह इतर पदाधिकाऱयांनी आमदारांचे स्वागत केले.
यावेळी माजी नगरसेवक राजेश तिरकण्णावर, सुरेश देवरमनी, धनपाल अक्षीमनी, महांतेश कांबळे, संजू कोलकार, राजू धनवाडे, परशराम कांबळे, कृष्णा कांबळे, पारीस कोलकार, सरोजा वडगावी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.