ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट वेगाने वाढत असताना दिसत आहे. मंगळवारी चार महिन्यांनंतर सर्वात कमी म्हणजे 31,443 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आता दैनंदिन रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. मागील 24 तासात 41,806 नवे रुग्ण आढळून आले. तर 581 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 कोटी 09 लाख 87 हजार 880 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4,11,989 जणांनी आपला जीव गमावला आहे.

बुधवारी देशात 39 हजार 130 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 कोटी 01 लाख 43 हजार 850 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 4 लाख 32 हजार 041 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल दिवसभरात 34 लाख 97 हजार 058 लसींचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत देशातील 39 कोटी 13 लाख 40 हजार 491 जणांना लस देण्यात आली आहे.
दरम्यान, देशातील रिकव्हरी दर आता 97.28 टक्क्यांवर आहे तर ॲक्टिव्ह रुग्णांचा दर 1.40 टक्के आहे. देशाचा दैनिक पॉझिटिव्हिटी रेट 2.59 टक्क्यांवर आहे.

आतापर्यंत देशात 43 कोटी 80 लाख 11 हजार 958 नमुन्यांची त पासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 19 लाख 43 हजार 488 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 14 जुलै 2021) एका दिवसात करण्यात आल्या.