ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 1718 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 67 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

भारतात आतापर्यंत 33 हजार 50 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1074 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 हजार 325 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 23 हजार 851 जणांवर देशभरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर महाराष्ट्रात 11 हजार 940 कोरोनाबधित आहेत. 1593 जण या आजारातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 9 हजार 915 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.