डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयाला महराष्ट्र राज्याशी जोडणाऱया दोडामार्ग चेकनाक्मयावरील सर्व अडथळे राज्य शासनामार्फत हटविण्यात आले आहे. देश अनलॉक प्रक्रीयेत काल सोम. दि. 1 सप्टेंबर पासून देशातील सर्व आंतरराज्य सीमा खुल्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारतर्फे देण्यात आल्यानंतर डिचोली तालुक्मयाला महाराष्ट्र राज्याशी जोडणाऱया दोडामर्ग चेकनाका खुला करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सीमाभागातील सर्व अंतर्गत रस्तेही खुले करण्यात आल्याने महाराष्ट्र सीमाभागातील गोव्यावर अवलंबून असलेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मार्च महिन्यात लॉकडाउन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोडामार्ग या मुख्य हमरस्त्यावर बेरिगेटस् व इतर अडथळे घालून रस्ता पूर्णपणे अडविण्यात आला होता. तसेच चौवीस तास या चेकनाक्मयावर पोलीस पहारा व या काळात राज्यात प्रवेश करणाऱया लोकांची माहिती तपासणी व इतर आवश्यक सोपस्कार करून घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱयांचे पथक तैनात होते. या सर्व यंत्रणांनी चांगली कामगिरी दोडामार्ग चेकनाक्मयावर बजावली होती. त्यावर डिचोलीचे उपजिल्हाधिकारी प्रदीप वायंगणकर व मामलेदार प्रवीणजय पंडित यांची देखरेख होती.
काल सोमवारी सकाळीच दोडामार्ग चेकनाक्मयावर घालण्यात आलेले अडथळे दूर करण्यात आले. तसेच या ठिकाणी तैनात करण्यात आलेला विशेष पोलीस ताफा हटविण्यात आला. महसूल खात्यातर्फे विशेष तंबू उभारून करण्यात आलेली व्यवस्था हटविण्यात आली. आता राज्यात दोडामार्ग सीमेवरून कोणीही कोणत्याही प्रकारच्या प्रमाणपत्रावीना प्रवेश करू शकतात. त्यांना आपवा वैद्यकीय अहवाल दाखविण्याची गरज नाही. तसेच चेकनाक्मयावर शुल्क भरून तपासणी करणे आवश्यक होते. त्याचीही आता गरज पडणार नाही. राज्य जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी सांगितले.
दोडामार्ग चेकनाका अनलॉक प्रक्रीयेत खुला करण्यात आल्यानंतर या रस्त्यावरून आतापर्यंत बंद असलेल्या सार्वजनिक लोकांकडून वाहतूक सुरू झाली. मात्र खासगी बसेसची वाहतूक सोमवारी दिसून आली नाही. दोडामार्ग (महाराष्ट्र) बाजारात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने सध्या बाजारातील दुकाने बंदावस्थेत आहेत. त्यामुळे दोडामार्ग बाजारात खरेदीसाठी जाण्याची लोकांची परिस्थिती नाही. काही काळानंतर या भागातील वाहतूकही पूर्वीच्या काळाप्रमाणे सुरू होऊन या भागातील परिस्थिती पूर्वपदावर येणार आहे.
दोडामार्ग या मुख्य हमरस्त्याबरोबरच डिचोली पोलिसांतर्फे डिचोली तालुक्मयाला महाराष्ट्र सीमेला जोडणाऱया गावांचीही रहदारी पूर्णपणे डंद केली होती. लॉकडाउन निर्देशाचे कडकपणे पालन करताना डिचोली पोलीस स्थानकाचे निरिक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिसांनी आंतरराज्य सीमा बंद राखण्याचे तसेच चोरीछुप्या पद्धतीने कोणी डिचोली तालुक्मयात घुसणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती. सर्व अंतर्गत रस्ते, पायवाटा, आडमार्ग, ओहोळ वाटा खोदून तसेच अडथळे घालून अडविण्यात आल्या होत्या. व त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्याचे काम स्वतः पोलीस निरिक्षक संजय दळवी व इतर उपनिरीक्षक करीत होते.
त्यामुळे महाराष्ट्रात राहूनही पूर्णपणे गोव्यावर अवलंबून असलेल्या सीमाभागातील लोकांचे हाल झाले होते. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सामान खरेदीसाठी गोवाच जवळचा होता. तसेच सीमाभागातील आंबडगाव, माटणे, आई, दोडामार्ग, तळेखोल यासारख्या भागातील मोठय़ा संख्येने युवक युवती गोव्यात कामाला आहेत. त्यांच्या कामावर व पर्यायाने उपजिविवेवर परिणाम झाला होता. अनलॉक प्रक्रियेत आता या सर्व अंतर्गत सीमाही खुल्या करण्यात आल्याने या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता या लोकांना बिनदिक्कत गोव्यात ये जा करायला मिळणार आहे.