ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. मुंबईत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या ही दीड हजारच्या पुढे गेली आहे.

मुंबईत बुधवारी कोरोनाचे 1,539 नवे रुग्ण आढळले तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला. दुपटीचा कालावधी 215 दिवसांपर्यंत खाली गेला आहे. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 3,37,123 वर पोहोचली आहे.
कालच्या एका दिवसात 888 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर मुंबईत आतापर्यंत 3 लाख 13 हजार 346 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत 11,379 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 11,511 जणांनी आपला जीव गमावला आहे.