आचरा सरपंच, आचरा जि. प सदस्य यांनी केले स्वागत
आचरा /प्रतिनिधी-
आचरा पोलिस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदिप पाटील नव्याने रुजु झाले आहेत. त्यानी नुकताच आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. आचरा सरपंच प्रणया टेमकर व जि.प.सदस्य जेरोन फर्नांडिस यांनी त्यांचे आचरा ठाण्यात स्वागत केले.
यावेळी त्यांच्यासमवेत माजी सरपंच जीजा टेमकर, सचिन हडकर, बाबू कदम, मुजफ्फर मुजावर, कृष्णा तारकर, शेखर कांबळी, उदय घाडी उपस्थित होते.
काही दिवसापूर्वी जिल्हात पोलिस दलात अनेक बदल्या करण्यात आल्या यात आचरा पोलिस स्टेशन प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांची हि बदली झाली होती. त्यांच्या जागी दोडामार्ग पोलिस स्टेशनचे ए. पी. आय कुलदिप पाटील यांनी काही दिवसापूर्वी पदभार स्विकारला.