साहित्य : लाल भोपळय़ाची एक स्लाईस, पाव चमचा काळीमिरी पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा, 1 चमचा कोथिंबीर बारीक चिरून, 1 चमचा तेल, अर्धा चमचा रेड चिल्ली फ्लेक्स, 1 चमचा लसूण पावडर, अर्धा चमचा कसूरीमेथी, मीठ, चाट मसाला
कृती : ओव्हन 200 डीग्री तपमानावर प्रिहीट करावे. भोपळय़ाची साल काढून त्याचे बटाटय़ाच्या फोडीप्रमाणे पातळ उभट फोडी करून घ्याव्यात. बाऊलमध्ये भोपळय़ाच्या फोडी घालून त्यावर वरून तेलाचे थेंब टाकून मिक्स करावेत. आता त्यात काळीमिरी पावडर, दालचिनी पावडर, जिरं, ओवा, कोथिंबीर, लसूण पावडर, मीठ, कसूरीमेथी आणि रेड चिल्ली फ्लेक्स घालून मिश्रण मिक्स करावे. आता बेकिंग ट्रे ला तुपाचा अथवा तेलाचा हात लावून त्यावर तयार भोपळय़ाच्या फोडी पसरवाव्यात. तयार ट्रे ओव्हनमध्ये 20 ते 25 मिनिटे ठेवून बेक करावे. आता तयार फ्राईज ताटात काढून वरून चाट मसाला टाकून खाण्यास द्या.