पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले अनेक जण दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यांना प्रथम ही लस दिली जाणार आहे. लस पुरवठा झाल्याबरोबर त्यांनाच प्रथम प्राधान्य दिले जाणार असून कोरोनाचा फैलाव वाढल्याने तालुक्मयामध्येही अधिक चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली आहे.
बुधवारी कित्तूर किल्ल्याच्या आवारात कोविड नियंत्रणाबाबत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. तालुक्मयामध्ये कोविड केअर सेंटर तसेच विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असणाऱया व्यक्तींना ठेवण्यात येणार आहे. जे कोरोना संशयित रुग्ण आहेत त्यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना दिली आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत औषधसाठा दिला जातो. आरोग्य विभागाचे पथक तसेच आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांबाबतची माहिती संग्रहीत करावी, असे त्यांनी सांगितले. ज्यांना तातडीने उपचार द्यायचे आहेत त्यांना इस्पितळात दाखल करा आणि त्यांच्यावर उपचार करा, अशीही त्यांनी सूचना केली.
कित्तूरचे आमदार महांतेश दौडगौडर यांनीही रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. तेंव्हा उपचार देण्यासाठी प्राधान्य द्या. बेडची व्यवस्था करा, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कोविड नियंत्रणाबाबत आणि उपचारासंदर्भातील माहिती दिली आहे. या बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.