ता. पं. कार्यकारी अधिकाऱयांचा कारवाईचा इशारा

प्रतिनिधी /बेळगाव
संभाव्य कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. प्रत्येक चेकपोस्टवर पीडीओ, आशा कार्यकर्त्या, पोलीस याचबरोबर इतर अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, काही पीडीओ याकडे दुर्लक्ष करून क्लार्कना आपल्या जागी कामाला लावत होते. याबाबत तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांनी पत्रक काढून पीडीओंनी चेकपोस्टवर आपली डय़ुटी आपणच बजावावी, असा आदेश दिला आहे. याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्धीस दिले होते. त्याची दखल घेऊन हा आदेश काढण्यात आला.
केरळ व महाराष्ट्रातून येणाऱया मार्गांवर चेकपोस्ट उभारण्यात आले असून कसून चौकशी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आता चेकपोस्टवर ग्राम पंचायत विकास अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना स्वतः तेथे जाणे अनिवार्य आहे. मात्र, काही पीडीओ ही जबाबदारी आपल्या क्लार्क व सेपेटरींवर सोपवून निवांत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तालुक्मयातील सर्वच पीडीओंना पत्रकाद्वारे आदेश बजावला आहे.
सध्या कोगनोळी नाका मुख्य असला तरी आडवाटांनी महाराष्ट्रातील नागरिक बेळगावात येत असतात. त्यामुळे बेळगावशी संपर्क असलेल्या शिनोळी, बेकिनकेरे, चलवेनहट्टी, केदनूर, हंदिगनूर, बाची आदी मार्गांवर आता पोलीस नजर ठेवून आहेत. चेकपोस्टवर पीडीओंबरोबरच सेपेटरी, क्लार्क व इतर कर्मचाऱयांनाही सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.